कॉलेजविषयी
जैन विद्या प्रसारक मंडळाचे अनुदानित विभागातील महत्त्वाची शाखा म्हणजे श्रीमती गेंदीबाई ताराचंद चोपडा हायस्कूल व ज्युनियर कॉलेज. पिंपरी चिंचवड नगरचा औद्योगिक विकास जसा होत गेला तसे नागरीकरण वाढले व या औद्योगिक कामगार वर्गातील पालकांच्या मुलांची शिक्षणाची सोय व्हावी यासाठी या शाळेची स्थापना 1973 मध्ये झाली. चिंचवड स्टेशन परिसरात त्या कालावधीतील ही एकमेव अशी अनुदानित शाळा होती. ११ वी व १२ वी उच्च माध्यमिकसाठी परिसरातील विद्यार्थ्यांना खूप दूर जावे लागू नये म्हणून संस्थेने शैक्षणिक वर्ष 1999 पासून इयत्ता अकरावी बारावी साठी वाणिज्य व कला शाखा सुरू केली.
उच्च माध्यमिक विभाग चालू केल्यामुळे परिसरातील कामगार वर्गातील सर्व विद्यार्थ्यांची या ठिकाणी शिक्षणाची सोय झाली. बाकीच्या संस्थांच्या तुलनेत या संस्थेची प्रवेश फी खूप कमी आहे. स्वर्गीय शंकरलालजी जोगिदासजी मुथा व स्वर्गीय मोतीलालजी चोपडा यांच्या शिक्षणाप्रती असणाऱ्या प्रेमामुळे शिक्षण हे सर्वांपर्यंत पोहोचले पाहिजे व सर्वांना कमीत कमी मोबदल्यात मिळाले पाहिजेत असा त्यांचा हट्ट होता. काळाची पावले ओळखून या विभागांमध्ये शैक्षणिक वर्ष 2020 21 पासून विज्ञान शाखा व वाणिज्य इंग्रजी माध्यम शाखा सुरू करण्याचा संस्थेचा प्रयत्न चालू आहे. शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांचा अध्यात्मिक, सांस्कृतिक, शारीरिक व बौद्धिक विकास झाला पाहिजे या हेतूने ज्युनियर कॉलेज विभागांमध्ये वेगवेगळे उपक्रम राबवले जातात. सर्व विद्यार्थी शिस्तीत वागले पाहिजे व समाजाचा एक आदर्श घटक बनले पाहिजेत असा हट्ट नेहमी आमचा सर्वांचा असतो. प्रत्येक उपक्रमांमध्ये जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना सहभागी करून घेण्याचा आमचा प्रयत्न विद्यार्थ्यांना शिस्तप्रिय व संस्कारक्षम बनतो.
ज्यु. कॉलेजची वैशिट्ये
- उत्कृष्ठ निकालाची परंपरा
- शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी ई-लर्निगची सुविधा
- संपूर्ण शालेय परिसर सी.सी.टी.व्ही. निगराणीखाली
- कनिष्ठ महाविद्यालयीन स्तरावर योगा प्रशिक्षण
- अद्यावत विज्ञान प्रयोगशाळा व सुसज्य ग्रंथालय
- विविध स्तरावरती क्रीडास्पर्धामध्ये सहभाग व विशेष प्राविण्य
- सुसज्ज इमारत व प्रशस्त खेळाचे मैदान
- वाणिज्य विभागांतर्गत वेगवेगळी प्रदर्शने व बँकांना भेटी
- वारकर्यांना फळवाटप, वृक्षारोपण व अनाथ आश्रमांना भेटी
- युवती सक्षमीकरण कार्यशाळा व रोव्हर रेजर पथक
- शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी व सर्वांगीण विकासासाठी विशेष उपक्रमांचे आयोजन

श्री.विक्रम भाऊसाहेब काळे, प्राचार्य